top of page

.png)
कॅबीनेट मंत्री मा. रविंद्र चव्हाण ह्यांची जन्मदिनानिमित्त जननी आशिष येथे सदिच्छा भेट.

राष्ट्र प्रथम....नंतर पक्ष.....शेवटी स्वतः...
या विचारसरणीला शिरसावंद्य मानून भारतीय जनता पक्षाच्या कामाला सुरुवात केली. त्या तिसऱ्या क्रमांकावर शेवटी येणाऱ्या "स्वतः" च्या कॅलेंडरमधला आजचा वाढदिवसाचा दिवसही लोकांमध्ये मिसळूनच....
वाढदिवसाला दोन ठिकाणी जातोच जननी आशिष आणि आपलं घर....यंदा भर पडली शास्त्रीनगर रुग्णालयाची...
जननी आशिष डोंबिवलीचच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील असं ठिकाण आहे जिथे लहानग्या अनाथांना केवळ छप्पर मिळतं असं नाही तर आई-मावशीच्या मायेचा पदर मिळतो...
तर आपलं घर म्हणजे....केवळ वृद्धाश्रम नाही तर जेष्ठ नागरिकांना सन्मानाने घराची ऊब मिळते असं हक्काचं ठिकाण...
त्याचसोबत केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आज तीन रूग्णवाहिकांचा लोकार्पण कार्यक्रम केला...रुग्णसेवेसाठी डोंबिवलीकरांना उपयोग होईल...
bottom of page